Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Solapur › #Women’sDayरेल्वेचे संचालन करणार महिला

#Women’sDayरेल्वेचे संचालन करणार महिला

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 08 2018 12:21PMसोलापूर : प्रतिनिधी

 महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर मध्य रेल्वे विभागात एक्स्प्रेस रेल्वेचे संचालन महिलांच्या हाती  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संचलनात रेल्वे ड्रायव्हर, गार्ड, तिकीट तपासणीस व यांत्रिक विभागाची जबाबदारी महिलांवर सोपविण्यात आली आहे.

महिला सशक्‍तीकरण अभियानांतर्गत महिला दिनादिवशी सोलापूर विभागातील पुणे-बारामती(गाडी क्र.51451) व बारामती-पुणे(गाडी क्र. 51452) या गाडीचे संपूर्ण संचालन व जबाबदारी मध्य रेल्वे सोलापूर विभागातील महिला कर्मचार्‍यांच्या हाती देण्यात आली आहे. पुणे-बारामती एक्स्प्रेस सकाळी 7.10 ला पुण्याहून सुटेल व सकाळी 10.20 ला बारामतीला स्थानकावर पोहोचेल. तर बारामती-पुणे ही एक्स्प्रेस बारामती स्थानकाहून सकाळी 10.40 ला निघेल व दुपारी 1.55 ला पुणे स्थानकावर पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली. 

पुणे-बारामतीदरम्यान धावणार्‍या एक्स्प्रेस गाडीचे लोकोपायलट अनिता राज व सहायक लोकोपायलट म्हणून अभिलाषा प्रजापती असणार आहेत. वैशाली रमेश भोसले या गार्डचे काम पाहणार आहेत. यावर गाडीचे परिचालन करणे, पार्सल बोगीचा चार्ज घेणे व देणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे. एक्स्प्रेस गाडीची रोलिंग-इन-रोलिंग-आऊट, एक्झामिनेशन करणे गाडीमध्ये काही दोष आढळल्यास संबंधित कर्मचारीवर्गास दुरुस्त करण्याचे आदेश देण्याचे कार्य माधुरी कांबळे, मीना जंगम, संगीता बाबू, लक्ष्मी रामचंदानी, जयश्री हाजी यांच्यावर देण्यात आली आहे. रेल्वे गाडीचे इंजन तपासणे व इंधन भरून घेण्याचे कार्य रजनी येमूल व विभावरी मेहरा करणार आहेत.