होमपेज › Solapur › महिला पोलिसांना धक्‍काबुक्‍की

महिला पोलिसांना धक्‍काबुक्‍की

Published On: Mar 25 2018 1:40AM | Last Updated: Mar 24 2018 10:35PMसोलापूर : प्रतिनिधी

औरंगाबादच्या वक्फ ट्युबिनल मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन करून महिला पोलिसांना धक्‍काबुक्‍की करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणार्‍या 40 जणांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  मैमुन्‍ना लियाकत शेख, शबाना पापा शेख, शामायन शेख, मलिका शेख, रैशात शेख, आशाबी सायबू पठाण, अफसाना हुसेन पठाण, रेश्मा पठाण, शहजान पठाण, रशिद पठाण, बिस्मिल्ला तांबोळी, रमेश दादा शेख, बानू शेख, रुक्साना शेख, लैला शेख, हसिना मेहबूब शेख, सलिमा बाळू शेख, हसिना शेख, शासना शेख, शबाना शेख, जमिला बशिर शेख, सिमना पठाण, आस्मा शेख, आसिफ शेख, अब्दुल मोहोळवाल, मुबारक मोहोळवाल, दादा दहेमान शेख, इब्राहिम पठाण, मुबारक पठाण, सुलतान शेख, अंकम शेख, अब्दुल अस्लम शेख व इतर 7 जण (सर्व रा. उमरड, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत करमाळा पोलिस ठाण्यातील  हवालदार विपिन सुरवसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. उमरड गावातील अर्जदार हुसेन महिबूब पठाण यांनी त्यांच्या शेतातील तोडलेला ऊस साखर कारखान्याला घेऊन जाण्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्याप्रमाणे करमाळा पोलिस ठाण्याकडून हुसेन पठाण यांचा ऊस कारखान्याला घेऊन जाण्यासाठी 1 महिला व 3 पुरुष कर्मचारी बंदोबस्तासाठी शुक्रवारी सकाळी गेले होते.

त्यावेळी मैमुन्ना शेख व इतर आरोपींनी बेकायदेशीरपणे अन्य लोकांना जमवून आम्ही तुम्हाला ऊस घेऊन जाऊ देणार नाही, आम्हाला स्मशानभूमीसाठी दोन एकर जागा द्या असे म्हणून रस्त्यावर बसून रस्ता अडवून महाराष्ट्र राज्य वक्फ ट्युबिनल मंडळाच्या औरंगाबाद येथील न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले.  त्यावेळी पोलिसांनी रस्त्यावर बसलेल्या लोकांना रस्त्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिस कर्मचार्‍यास धक्‍काबुक्‍की करुन सरकारी कामात अडथळा आणून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे तपास करीत आहेत.
 

 

tags : Solapur,news,Aurangabad, violation, Wakf Tubinal, Board, Order,