होमपेज › Solapur › सोलापूर 80, तर करमाळा 70, बार्शीला 75 लाख निवडणूक खर्च

सोलापूर 80, तर करमाळा 70, बार्शीला 75 लाख निवडणूक खर्च

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:51PMसोलापूर : प्रतिनिधी 

आगामी सोलापूर, बार्शी आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी प्रारुप याद्या तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू  आहे. मात्र पहिल्यांदाच या निवडणुका थेट शेतकर्‍यांमधून होणार असल्याने निवडणूक खर्च वाढला आहे. 

तीनही बाजार समित्यांनी प्रति मतदार शंभर रुपये खर्च अपेक्षित धरुन निवडणूक खर्च निवडणूक शाखेकडे जमा करण्याचा सूचना निवडणूक शाखेने केल्या आहेत. यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 80 लाख, बार्शी 75 लाख, तर करमाळा बाजार समितीने 70 लाख जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बार्शी आणि करमाळा या बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्या बाजार समित्यांना हा निवडणूक खर्च परवडेल का, असा प्रश्‍न आहे. सोलापूर बाजार समितीने मात्र खर्च जमा करण्यास होकार दर्शविला असल्याचे समजते. 

पूर्वी या निवडणुका मोजक्या मतदारांमधून होत असल्याने खर्च मर्यादित होता. आता मतदार संख्या वाढल्याने कार्यक्षेत्रातील प्रत्येक सात- बारा उताराधारक मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून पर्यायाने निवडणूक खर्चही वाढला आहे.