Thu, Apr 25, 2019 17:37होमपेज › Solapur › चौदाव्या वित्त आयोगातून ग्रा.पं.साठी ६१ कोटींचा निधी

चौदाव्या वित्त आयोगातून ग्रा.पं.साठी ६१ कोटींचा निधी

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:16PM

बुकमार्क करा

सोलापूर ः प्रतिनिधी

चौदाव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील 1 हजार 29 ग्रामपंचायतींसाठी दुसर्‍या टप्प्यात केंद्र शासनाकडून 61 कोटी 71 लाख 41 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी तालुकानिहाय ग्रामपंचायतींना निधी वितरित केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींसाठी 5 कोटी 22 लाख 56 हजार, बार्शी तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींसाठी 5 कोटी 49 लाख 57 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. 

करमाळा तालुक्यातील 105 ग्रामपंचायतींसाठी 5 कोटी 6 लाख 31 हजार, माढा तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींसाठी 6 कोटी 13 लाख 30 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  माळशिरस तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींसाठी 9 कोटी 47 लाख 56 हजार, मोहोळ तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीींसाठी 5 कोटी 43 लाख 6 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी 3 कोटी 95 लाख 66 हजार, उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 गावांसाठी 2 कोटी 31 लाख 61 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 7 कोटी 5 लाख 11 हजार, सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी 6 कोटी 10 लाख 97 हजार, तर द. सोलापूर तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी 5 कोटी 45 लाख 55 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 सन 2011 च्या जनगणनेनुसार 90 टक्के प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने हा निधी विकास आराखड्यात समाविष्ठ असणार्‍या कामांवर खर्च करावा, यासाठी ग्रामसभेत ठराव झालेल्या कामांची निवड करण्यात यावी, प्राधान्यक्रम ठरविताना पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांकरिता प्राधान्य द्यावे, अशा सूचना डॉ. भारुड यांनी दिल्या आहेत.