होमपेज › Solapur › आता २४ तास मेडिकल औषधे

आता २४ तास मेडिकल औषधे

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 8:50PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष निशांत सावळे व कार्याध्यक्ष सुहास कदम यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस आयुक्त महादेव तांबडे व सदर बझार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करून 24 तास पेट्रोल पंप सेवा सुरु केल्यानंतर आता 24 तास मेडिकल सेवा सुरु राहणार आहे. शहरवासियांना 24 तास पेट्रोल मिळावे, यासाठी डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंप सुरु ठेवण्याची विनंती करून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने 24 तास इंधन सेवा सुरु केली.

बाहेर गावच्या नागरिकांसाठी तसेच शहरातील विद्यार्थी तसेच परगावांतून शहरात शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी हे वसतिगृहामध्ये असतात आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता रात्रभर 24 तास मेडिकल सुविधा सुरु असावी, अशी अनेकांची मागणी होती. याबाबत पोलिस आयुक्त महादेव तांबडे व पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर  यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी रात्रीच्या या सेवांना संरक्षण व पाठिंबा पुरवणार असल्याने हे शक्य होत असल्याचे मत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने शहर कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केले.