होमपेज › Solapur › इंद्रायणी एक्स्प्रेस ५ मार्चपासून सुरू होणार

इंद्रायणी एक्स्प्रेस ५ मार्चपासून सुरू होणार

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:50PMसोलापूर : प्रतिनिधी

  इंद्रायणी (इंटरसिटी) 5 मार्च पासून सुरू करणार असल्याची माहिती मंडल रेल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी सांगितली. 125 दिवसांच्या विश्रांतीनंतर इंद्रायणी पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर-पुणे या स्थानकादरम्यान धावणार आहे.तसेच पुणेहून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर स्थानकाकडे रवाना होईल. या गाड्यांमुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना लाभ घेता येईल.

रेल्वे प्रशासनाने वाशिंबे ते जेऊर दरम्यान ट्रॅकच्या कामामुळे 1 नोव्हेंबर 2017 पासून दररोज 1 तास 45 मिनीटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय  घेतला होता. त्यामुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणार्‍या हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंद केले आहे. दुपारच्या सत्रात असणार्‍या नागरकोईल व उद्यान एक्स्प्रेसने अनेकांनी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु आरक्षण केलेली तिकिटे कन्फर्म होत नाहीत. रेल्वे प्रशानाकडून हुतात्मा एक्स्प्रेसला अधिक कोच जोडून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला 
आहे.