Thu, Apr 18, 2019 16:38होमपेज › Solapur › सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी चक्क खड्डयांमध्ये झोपून केले अभिनव आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी चक्क खड्डयांमध्ये झोपून केले अभिनव आंदोलन

Published On: Sep 08 2018 10:30PM | Last Updated: Sep 08 2018 10:30PMमोहोळ : वार्ताहर 

 गेल्या अनेक महिन्यांपासून दुरूस्तीपासून वंचीत असलेल्या मोहोळ -कामती ते कोरवली म्हणजेच विजापूर महामार्गाच्या कामाच्या दिरंगाई पणाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी नजिक-पिंपरी जवळ चक्क रस्त्यातील खड्डयांमध्ये झोपून अभिनव आंदोलन केले. गेल्या दोन वर्षांपुर्वी या रस्त्यावरील टोल नाका बंद झाल्यानंतर महामार्ग प्रशासनाकडे हा रस्ता जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र आजही सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच ताब्यात आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने या वर्षभरामध्ये एक रूपयाचाही नवीन नीधी देखील दुरुस्तीसाठी उपलब्ध करून आणला नाही. त्यामुळे या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गतवर्षी ठेकेदारांवर लाखो रुपये खर्ची टाकून प्रशासनाने खड्डे बुजवले असे कागदोपत्री दाखवले खरे मात्र नंतर सहा महिन्यांमध्ये या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडून हा मार्ग जीवघेणा बनला आहे .

याबद्दल वेळोवेळी मागणी करून देखील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने हलगर्जीपणा केला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी गतवर्षी देखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. गतवर्षीच्या संबंधित प्रशासनाने या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्ची टाकलेले काम नेमके झाले कसे ?आणि झालेच होते मग लगेच काही दिवसातच पुन्हा खड्डे पडलेत कसे ?असा संतप्त सवाल यावेळी अनिल पाटील यांनी माध्यमांशी यावेळी बोलताना व्यक्त केला. आठवड्याभरात हे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास त्यापेक्षाही आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला . विशेष बाब म्हणजे अनिल पाटील यांच्या समवेत रस्त्यावर बसून या आंदोलनामध्ये परराज्यातील ट्रकचालकांनीही आपला सहभाग नोंदवून ही समस्या वैयक्तिक नसून सार्वजनिक असल्याचे दाखवुन दिले.

सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील असून ते विविध आंदोलनांमध्ये मुळे यापूर्वीही जिल्ह्यात चर्चेत आले होते .त्यांनी शासनाचे कोणतेही अनुदान न घेता मोफत जनावरांसाठी चारा छावणी चालवली होती ती देखील स्वखर्चातुन. त्यामुळे मोहोळ ते कामती रस्त्याच्या दुरुस्तीच्या लढाईमध्ये आता सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील हे उतरल्यामुळे प्रशासनाला मात्र आणखी डोकेदुखी वाढणार आहे.

या अदोलना वेळी कोणताही प्रसारमाध्यमांचा फौजफाटा न घेता कार्यकर्ते समवेत न घेता हातात केवळ एक कागदोपत्री पुठ्ठ्याचा फलक घेऊन अनिल पाटील नजीक पिंपरी येथील महामार्गावरील खड्ड्यांमध्ये झोपले. येणारे जाणारे पाटील यांच्या या आंदोलनाकडे  पाहत होते. नंतर मात्र एका मोबाईलधारकाने अनिल पाटील यांच्या या अभिनव आंदोलनाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. पाहता पाहता सदर चा फोटो तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात पोहोचला. यापूर्वीही अनिल पाटील यांनी अशाच पद्धतीने अभिनव प्रकारे आंदोलन करत विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गतवर्षी मोबाईलचे टाॅवर वर चढुन त्यांनी विविध मागण्या शासनाकडे मांडल्या होत्या.