माढा : प्रतिनिधी
माढा शहरामध्ये शिवाजीनगर येथील एक वर्षांच्या मुलीचा टबमधील पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. दुर्वा सायबू शिंदे असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढ्यात शिवाजीनगर भागात सायबू मारुती शिंदे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात लहान मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर ही घटना उडघडकीस आली. त्यानंतर तिला ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायबू शिंदे हे आसपासच्या गावांमध्ये यात्रेत हातातील कडे, कानातील कुंडल इत्यादी विकून उदरनिवार्ह करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. तिच्याच मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags : Girl, Death, Drawning, Water, Tub
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM