Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Solapur › 32 पैकी सहा प्रकल्प दीडच महिन्यात तुडुंब

32 पैकी सहा प्रकल्प दीडच महिन्यात तुडुंब

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 8:55PMउमरगा : शंकर बिराजदार

तालुक्यात यावर्षी दिड महिन्यात सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ होत गुरूवारपर्यंत तालुक्यातील मध्यम, लघु व साठवण  32 प्रकल्पांपैकी 6 प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर 5 प्रकल्पात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक, 7 प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा अधिक, 10 प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. 3 प्रकल्प मृतसाठ्यात, तर 1 प्रकल्प दिड महिना लोटला तरी अजूनही कोरडाच आहे.

तालुक्यात यंदा 8 जून व 22 रोजी  झालेल्या मुसळधार पाऊस आणि मागील आठवड्यात संततधार पाऊस  झाला. तर गुरुवारी दुपारच्या वेळी शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 799 मिलीमीटर असून दिड महिन्यात निम्म्यापेक्षा जास्त 464.4 मिमी पाऊस झाल्याने गुरूवारपर्यंत तालुक्यातील 32 प्रकल्पांपैकी जकापूर मध्यम, कोरेगाव, कोरेगाववाडी लघु प्रकल्प, तर भूसणी, भिकारसांगवी आणि दगडधानोरा साठवण तलाव हे सहा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. उर्वरीत प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा कंसात टक्केवारी तुरोरी मध्यम (74. 37) टक्के, तर मुरळी (54.64) टक्के, कदेर (72.5), वागदरी (57.5), दाळींब (52.34), नारंगवाडी (52.359) टक्के या पाच लघु प्रकल्पात पन्नास टक्क्यां पेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. बेनितुरा मध्यम प्रकल्पात (28.22) टक्के, तर कोळसुर (48.3), गुंजोटी (49.58), तलमोडवाडी (36.12), कसगी (39. 54), एकुरगा (45.138), गुंजोटीवाडी (39.519) टक्के या सहा लघु प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर कसमलवाडी (9.79), कुन्हाळी (12.46) व काळलिंबाला लघु प्रकल्पात (12.30) टक्के पाणीसाठा असून पेठसांगवी प्रकल्प मृतसाठ्यात आहे. डिग्गी (20.25), केसरजवळगा अनुक्रमे 1 व 2 (1.020 व 0.26), सरोडी (19.580), बलसूर अनुक्रमे 1 व 2 (3.824 व 6.494), कोराळ (4.578) टक्के इतका या नऊ साठवण तलावात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर  सुपतगाव व रामनगर हे दोन साठवण तलाव अजूनही मृतावस्थेत आहेत. तर आलुर साठवण तलाव पावसाळ्याच्या दिड महिन्यानंतरही कोरडाच आहे.

दिड महिन्यात 464.4 मिमी पाऊस

तालुक्यातील पाच मंडळ विभागात  शुक्रवार, 20 जुलै रोजी सकाळपर्यंत सर्वाधिक (589) मिमी उमरगा मंडळात पाऊस झाला आहे. तर मुळज- (480) मिमी, नारंगवाडी- (422) मिमी, दाळींब- (444) मिमी आणि मुरूम-(380) मिमी पाऊस झाला आहे.