होमपेज › Solapur › सोलापुरात मूक कँडल मार्च 

सोलापुरात मूक कँडल मार्च 

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 9:12PMसोलापूर : प्रतिनिधी 

देशभरात लहान मुलींवर सातत्याने अत्याचार होत आहेत. अशा कृत्यांना आळा बसविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबरोबरच या प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी व्हावी, या मागणीसाठी रविवारी प्रहार संघटनेच्या वतीने रंगभवन ते स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत शेकडो युवकांनी हातात मेणबत्ती पेटवून आपल्या भावना अबोल आंदोलनातून व्यक्त केली. 

प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ता मस्के पाटील, शहरप्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सांयकाळी सातच्या सुमारास रंगभवन चौकात शेकडो युवकांनी मेणबत्ती पेटवून व हातात आपल्या मागण्यांचे फलक लावून महात्मा गांधी पुतळ्याकडे मेणबत्ती मोर्चा काढण्यास प्रारंभ केला. यावेळी युवतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

देशात गत अनेक महिन्यांपासून लहान मुलींवर बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी, अशा प्रकरणांतील आरोपींचा धिक्कार करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.