Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Solapur › श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेची ‘कप्पडकळी’ने सांगता

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेची ‘कप्पडकळी’ने सांगता

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:58PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी
शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यांची गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या  यात्रेची  सांगता मंगळवारी दुपारी सोमशेखर देशमुख यांच्या वाड्यामध्ये योगदंड पूजनाने झाली. यावेळी होमहवन, पूजन व महाप्रसाद असे कार्यक्रम झाले. रात्री बाळी वेसमधील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये नंदीध्वज व मानकर्‍यांच्या वस्त्र विसर्जन ‘कप्पडकळी’चा कार्यक्रम झाला.

परंपरेनुसार नंदीध्वज मानकरी हिरेहब्बू यांच्या निवासस्थानातून  मानाचा  योगदंड   मानकरी  देशमुख यांच्या दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत-गाजत आणण्यात आला. तेथे मानकरी सोमशंकर  देशमुख, राजशेखर, सुधीर देशमुख व  कुटुंबीयांकडून योगदंडाची पूजा करण्यात आली, तसेच हा योगदंड आणण्याचा मान असणार्‍या कंठीकर स्वामी यांच्यासह हिरेहब्बू परिवारातील राजशेखर, जगदीश, विकास, मनोज, तर मानकरी हब्बू परिवारातील आनंद हब्बू यांच्यासह सिद्धलिंग, विजयकुमार, शिवशंकर, शिवानंद, राजेश व गुरूराज हब्बू यांचे विधीवत पूजन झाल्यानंतर प्रसाद देण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान कमिटीची पंचमंडळी, पालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. 

 भक्‍तांवरील संकट सिद्धरामाने स्वत:वर घेतले : हिरेहब्बू होमविधीवेळी नंदीध्वज जाताना झालेली नंदीध्वजाचा खेळणा पेटण्याची  दुर्घटना याचे  चिंतन  केले तर असे कळते की, देवाने  भक्‍तांवरचे  संकट स्वतःवर घेतले असल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. अक्षता सोहळ्याला झालेल्या विलंबाबद्दल  माफीही त्यांनी मागितली तसेच यंदाच्या यात्रेत नंदीध्वजाला आग लागलेली घटना छोटी नाही, यापूर्वी असे कधीच झाले नाही. बहुतेक शहरावर काहीतरी मोठे संकट आले असावे आणि ते सिद्धरामांनी स्वतःवर घेतले आहे. मंद्रुपच्या यात्रेत झालेली दुर्घटना हीसुद्धा दु:खद आहे, असे ते म्हणाले.

 रात्री झाली कप्पडकळी

बाळी वेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात रात्री नऊच्या सुमारास कप्पडकळी अर्थात नंदीध्वजांच्या व मानकर्‍यांच्या वस्त्र विसर्जनाचा कार्यक्रम झाला. मंदिरास दोन प्रदक्षिणा मारून कप्पडकळी कार्यक्रम झाला.