Mon, Nov 19, 2018 11:35



होमपेज › Solapur › पाथरी लघु प्रकल्पाच्या भरावावर झुडपांचे साम्राज्य

पाथरी लघु प्रकल्पाच्या भरावावर झुडपांचे साम्राज्य

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 11:33PM

बुकमार्क करा




बार्शी : गणेश गोडसे

ब्रिटीशकाळात दुष्काळी परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या व बार्शी तालुक्याच्या पूर्वभागातील शेती व ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या पाथरी (ता. बार्शी) येथील तलावाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची वाढ झाल्यामुळे व संबंधित विभागाकडून वृक्षाची खबरदारी घेतली जात नसल्यामुळे लघु प्रकल्पाच्या भरावास भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. 
भरावावर मोठमोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन तोडून घेऊन भेगाबाबत दखल घ्यावी, अशी मागणी पाथरी व परिसरातील गावातील नागरिक व शेतकरी बांधवांमधून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्याच्या पूर्वभागातील बालाघाट पर्वत रांगातील डोंगरी व जंगली भागात पडलेले पाणी वाहून न जाता ते याच भागात थांबवून येथील जनतेच्या शेतीला उपयोगी पडावे, ही दूरदृष्टी ठेऊन तत्कालीन इंग्रज शासनाने  पावले उचलून हा प्रकल्प उभा केला होता. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडलेले पावसाचे पाणी अडवण्यात आले होते व पाथरी तलावाची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांनी या प्रकल्पाचे काम सुरू करून  तो 1909 मध्ये पूर्णत्वास नेला होता. पाथरी लघु प्रकल्पाच्या निर्मितीला 108 वर्ष पूर्ण झाले आहेत. तो प्रकल्प आजही सुस्थितीत आहे. मात्र प्रकल्पाची योग्य प्रकारे निगराणी करण्याची जबाबदारी  असलेला विभाग या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. लक्ष दिले जात नसल्याचे चित्र सध्या निदर्शनास येत आहे.सध्या या ब्रिटीशकालीन प्रकल्पाच्या भरावावर मोठमोठे वृक्ष वाढले आहेत.वृक्ष वाढल्यामुळे भरावावर मोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. पाटबंधारे विभागाकडून याची काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

सरकार पाणी आडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबवून तसेच जलयुक्त शिवार अभियान यासारखे समाजाभिमुख उपक्रम योजना मार्गी लावून तसेच इतर अनेक योजना सुरू करून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर तलावातील पाणीसाठ्याची देखभाल होणेही गरजेचे असते. मात्र पाथरी तलावावर सध्या बाभळ, लिंब आदी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची मोठी वाढ झाली आहे. तसेच लक्षणीय बाब ही की, तलावाच्या भरावाच्या वरच्या पृष्ठभागावर फट पडल्याचेही निदर्शनास  येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून चिंतेचे वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे.