Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Solapur › शिवराज्याभिषेक सोहळादिन उत्साहात 

शिवराज्याभिषेक सोहळादिन उत्साहात 

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 9:01PMसोलापूर : प्रतिनिधी

पुरस्कार वितरण, पदयात्रा, अभिवादन, अभिषेक करून विविध संस्था, संघटना, मावळ्यांकडून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात केला.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, सुवर्ण गणपती प्रतिष्ठान, भागवत चाळ यांच्याकडून यंदाच्या वर्षापासून विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींना ‘शिवगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येत आहे. यंदा पोलिस डिपार्टमेंटमधील मोहन गवळी आणि संतोष कुलकर्णी यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. शिवस्मारक, शिंदे चौक येथे बुधवारी सकाळी 10 वाजता शिवराज्याभिषेक करण्यात आला. यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे अमोल जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रताप चव्हाण, भैय्या धाराशिवकर, दास शेळके, गुरूशांत धुत्तरगावकर, उमेश जमगी, अरूण देठे, सुनील घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संभाजी आरमारकडूनही शिवस्मारक, शिंदे चौक येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पीआय शहाजी पवार, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, निरंजन बोद्दूल, नानासाहेब काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक उत्साहात केला. यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, संघप्पा म्याकल, संजय सरवदे, प्रकाश डांगे, नानासाहेब भोसले आदींची उपस्थिती होती. शिवराज्याभिषेकानंतर संभाजी आरमारच्या पदाधिकार्‍यांनी शिवस्मारक ते शिवाजी चौकपर्यंत पदयात्रा काढली. पदयात्रेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. शेवटी शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवादन केले.

पालकमंत्री, महापौरांकडूनही अभिवादन
शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि महापालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, महापालिका परिवहन समितीचे सदस्य विजय पुकाळे, मोहन कांबळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.