Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Solapur › माळीनगरमध्ये शिवजयंती उत्साहात, मावळ्यांचा उत्साह शिगेला 

माळीनगरमध्ये शिवजयंती उत्साहात, मावळ्यांचा उत्साह शिगेला 

Published On: Feb 19 2018 3:03PM | Last Updated: Feb 19 2018 3:03PMमाळीनगर  : वार्ताहर

भगवे झेंडे , पताका, शिवरायांची महती सांगणारे  पोवाडे, रांगोळ्या आणि भगव्या रंगांची मुक्त उधळण. यामुळे घराघरात  सकाळपासूनच ओंसडून वाहणाऱ्या शिवजयंतीचा उत्साह परिसर दणाणून निघाला होता. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

माळीनगर परिसरातील बिजवडी, सवतगव्हाण,  तांबवे,  गणेशगाव,  संगम , वाघोली, लवंग,  बाभूळगाव, पंचवीस चार,  गट नं २ , माळीनगर, श्रीहरीनगर, पंचवटी, जयसिंहनगर येथील युवक युवती, कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव मंडळे भान हरपून उत्साहाने एकत्र येताना दिसत होती. मुख्य चौकातून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे घरोघरी देखील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.