Wed, Nov 21, 2018 19:33होमपेज › Solapur › शिवछत्रपती पुरस्कारात सोलापूरचा षटकार

शिवछत्रपती पुरस्कारात सोलापूरचा षटकार

Published On: Feb 12 2018 8:22PM | Last Updated: Feb 12 2018 8:22PMसोलापूर/मुंबई : प्रतिनिधी 

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांत सोलापूरने षटकार ठोकला आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये प्रार्थना ढोंबरे, सुयश जाधव, वसंत सरवदे, ऋतिका श्रीराम, श्रीकांत ढेपे, नारायण जाधव यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

यामध्ये 2016-17 सालच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूरच्या विभीषण पाटील यांना जाहीर झाला आहे. यासोबत पुण्याच्या रमेश तावडे (2014-15) आणि अरुण दातार (2015-16) यांनादेखील जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रुपये 3 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेल्या तीन वर्षांचे  एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

लॉन टेनिससाठी बार्शीची कन्या प्रार्थना ठोंबरे, कुस्तीसाठी वसंत दामाजी सरवदे, स्विमिंगसाठी ऋतिका श्रीराम, नारायण जाधव, सुयश जाधव याला दिव्यांग जलतरण, श्रीकांत ढेपे यांना खो-खो संघटक यांना आपापल्या क्षेत्रात केलेल्या उलेखनीय कार्याबद्दल मानाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यामधून 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडणार आहे.