Mon, Jan 21, 2019 17:08होमपेज › Solapur › काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी शिंदेंच्या नावाची चर्चा !

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी शिंदेंच्या नावाची चर्चा !

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:40PMसोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावण्यासंदर्भात पक्षपातळीवर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. सुशीलकुमार शिंदे हे यापूर्वी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते. शिवाय, केंदीय गृहमंत्री, ऊर्जामंत्री, संसद सभागृह नेते यासह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पक्षाने त्यांच्यावर सोपविली होती.

राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रसने विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा उभारी घ्यावयाची असल्यास प्रदेशाध्यक्षपदासाठी सुशीलकुमार यांचे नाव पक्षामध्ये अग्रक्रमाने चर्चेत आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाने त्यांची वर्णी  लावली  नव्हती. त्यामुळेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी त्यांचा पक्षाकडून विचार केला जात आहे. पक्षाने मला आजपर्यंत न मागता बरेच काही दिले आहे. त्यामुळे मी पक्षाला काही मागत नाही. तरी पक्षाने मला काही जबाबदारी दिल्यास ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. यापूर्वीही मी दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळले आहे.

- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री