Fri, Jul 19, 2019 22:05होमपेज › Solapur › भाजप सरकार अपयशी : आ. चव्हाण

भाजप सरकार अपयशी : आ. चव्हाण

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:49PMशेणोली :  वार्ताहर

आगामी निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढल्यास विजय शक्य आहे. निवडणूक एकत्र येवून लढण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ 31 टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित 69 टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, तर भाजपला सत्ता अशक्य होती. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस विचाराचे सर्वजण एकत्र आलो, तर केंद्र व राज्यातील सरकारला सळो की पळो करु, असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

वडगाव हवेली (ता. कराड) येथे आ. विश्‍वजीत कदम यांची विधानसभेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झालेबद्दल त्यांचा नागरी सत्कार व गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उदघाटन समारंभात ते बोलत होते.   यावेळी आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. डॉ. विश्‍वजीत कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनिल पाटील, कराड नगरपालिका नगरसेवक इंद्रजीत गुजर, शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

     आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांच्याएवढे अपेक्षांचे ओझे विश्‍वजीतवर आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय युथ काँग्रेसचे अध्यक्षपद चालून आले होते. त्यामुळे विश्‍वजीत हे इतके मोठे नेतृत्व आहे. सामान्यांना सन्मानाची वागणूक देणारी पतंगराव कदम यांची शिकवण घेवून विश्‍वजीत काम करतील. त्यांना संघर्ष कमी नाही, याचीही मला जाणीव आहे. मला ते निश्‍चितच चांगले काम करतील, याची खात्री आहे. 

आ. विश्‍वजीत कदम म्हणाले, पतंगराव कदम यांनी 45 वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. महाराष्ट्राचे संरक्षण व शेतकऱयांचे शोषण थांबवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आनंदराव पाटील, आ. बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील यांची भाषणे झाली. जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. व संपतराव जगताप यांनी आभार मानलेर्.ीं