Tue, Nov 13, 2018 03:44होमपेज › Solapur › भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शशिकांत देशमुख यांची निवड

भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शशिकांत देशमुख यांची निवड

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:23PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी शशिकांत आप्पासाहेब देेेेशमुख यांची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील व भाजपाचे राज्य संघटन मंत्री विजय पुराणिक, भाजप प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे सांगोला तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. 

मुळचे जवळा (ता.सांगोला) येथील शशिकांत देशमुख मुंबई शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते भाजपामध्ये सक्रीय काम करत असून चार वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिका व नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून पक्षासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या आजवर केलेल्या सर्व कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे-पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शशिकांत देशमुख यांना राज्यपातळीवर काम करण्याची मोठी संधी दिली आहे. यावेळी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष आनंदा फाटे, नगरसेवक ऍड.गजानन भाकरे, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.परेश खंडागळे, अनुसूचित जाती भाजपा तालुका मोर्चाचे अध्यक्ष तानाजी कांबळे, किसान युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शंकरराव बिले, अल्पसंख्यांक सेलचे रफीक शेख, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास व्हनमाने, उपाध्यक्ष देवा खरात, आकाश करांडे, पत्रकार हमीद इनामदार यांच्यासह सर्व सेल, आघाड्या, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.