Thu, Jul 18, 2019 04:38होमपेज › Solapur › शकुंतला काळे नगरकर यांना कै. ज्ञानोबा उत्पात पुरस्कार

शकुंतला काळे नगरकर यांना कै. ज्ञानोबा उत्पात पुरस्कार

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:26PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

 पंढरपूर अर्बन बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रतिभा महोत्सवात लावणीसाठी आपले आयुष्य  वेचत महाराष्ट्राची लावणी आपल्या आदाकरीने, कलेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवून या कलेचा आनंद देणार्‍या व कलेची ही चळवळ अखंड वृध्दिंगत करणार्‍या ज्येष्ठ लावणी कलावंत शकुंतला (काळे) नगरकर यांना कै.ज्ञानोबा उत्पात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पंढरपूर अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली व बँकेचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांचे नेतृत्वाखाली अग्रगण्य असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवानिमित्ताने दि. 17 ते 22 जानेवारी दरम्यान युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्वात कै.ज्ञानोबा उत्पात पुरस्कार ज्येष्ठ लावणी कलावंत शकुंतला (काळे) नगरकर यांना ज्येष्ठ साहित्यीक व लावणी-लोककला महोत्सवाचे अभ्यासक विश्‍वास पाटील यांचे हस्ते व दिलीप सोपल यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रू.11,000 चा धनादेश आहे.

पंढरपूर अर्बन बँकेचे शतकमहोत्सवाचे निमित्ताने सुरू केलेला युवा प्रतिभा महोत्सव याहीवर्षी पुढे चालू ठेवणेत आला आहे.राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सव 2018 या कार्यक्रमाचे आयोजन दि.17 जानेवारी ते 22 जानेवारी 2018 पर्यंत दररोज सायं.6 ते 10 वाजेपर्यंत टिळक स्मारक मंदिर, येथे केले आहे. यानिमित्ताने शहरवाशीयांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
चित्रप्रतिभा स्पर्धेत सदर महोत्सवाची सुरूवात शुक्रवार दि.12 व दि.13 जानेवारी या दोन दिवसात आयोजित केली आहे. या स्पर्धेत रचनाचित्र हा प्रकार समाविष्ट आहे. ही चित्रप्रतिभा स्पर्धा 16 ते 30 वयोगटासाठी होणार असून मातृत्व, त्याग व भक्ती हे विषय चित्रप्रतिभा स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत.

बँकेतर्फे यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची धूरा भूषविणारे डॉ.गोरक्षनाथ बंडा महाराज देगलुरकर (कुलगुरु, डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे) व डॉ.अनिल गोपाळराव भाळवणकर (कुलगुरु, कॅलोरेक्स टिचर्स युनिव्हर्सिटी, अहमदाबाद) यांना देणेत येणार आहे. हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा डॉ.नितीन करमाळकर (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे हस्ते व बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन दि.13 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता कवठेकर प्रशाला, नाथ चौक करण्यात आले आहे. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी  प्रतिभा महोत्सवाचे आयोजन केले दि.17 रोजी केले आहे.  युवा प्रतिभा महोत्सवात युवकांसाठी आयोजित सुगमगीत, युगुलगीत गायन स्पर्धा, वैयक्तीक नृत्य, समूहनृत्य व चित्रप्रतिभा स्पर्धांचा समावेश आहे. दि.18 ते 20 रोजी संपन्न होत आहेत. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे सुगमगीत, वैयक्तिकनृत्य या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-5000, द्बितीय क्रमांक-3000, तृतीय क्रमांक-2000 रूपयाची पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.  बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रमाचे देशभरामध्ये विविध 88 ठिकाणी प्रयोग होणार असून त्यामध्ये आपल्या पंढरपूरला हे यजमानपद मिळाले आहे. याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, रजनीश कवठेकर, उदय उत्पात, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, रेखाताई अभंगराव, माधुरीताई जोशी, राजेंद्र बजाज, भालचंद्र कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रा.विरधे, व्यवस्थापक भालचंद्र जोशी उपस्थित होते.