Sat, Feb 23, 2019 00:34होमपेज › Solapur › शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्यचक्रवीर पुरस्कार प्रदान

शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्यचक्रवीर पुरस्कार प्रदान

Published On: Apr 23 2018 8:18PM | Last Updated: Apr 23 2018 8:18PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे सुपूत्र शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर जाहीर झालेला शौर्यचक्रवीर सन्मान आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. शहिद कुणाल गोसावी यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी आणि मातोश्री सौ. वृंदाताई गोसावी यांनी हा सन्मान स्विकारला. 

शहिद मेजर कुणाल गोसावी हे 28 नोव्हेंबर 2016 रोजी काश्मीरमधील नगरोटा येथे अतिरेक्यांशी लढताना शहिद झाले होते. त्यांच्या शौर्याचा सन्मान म्हणून शौर्यचक्रवीर हा सन्मान त्यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता. 

सोमवार ( दि.23 रोजी ) दिल्ली येथे सायंकाळी  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा सन्मान शहिदांच्या कुटूंबीयांना प्रदान करण्यात आला. शहिद कुणालच्या पत्नी उमादेवी, मातोश्री वृंदाताई गोसावी यांनी हा सन्मान राष्ट्रपतींच्याहस्ते स्विकारला. यावेळी निवेदीकेने शहिद कुणाल गोसावी यांच्या गाजवलेल्या पराक्रमाचे वर्णन ऐकताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. टाळ्यांचा कडकडाटात हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.