Sun, Nov 18, 2018 02:54होमपेज › Solapur › शाळकरी मुलीचा लैंगिक छळ

शाळकरी मुलीचा लैंगिक छळ

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:17PM सोलापूर : प्रतिनिधी

बँकेत खाते उघडून पासबुक काढण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका  तरुणाविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे घडली. धनाजी बिरू कोळेकर (वय 25, रा. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) असे गुन्हा  दाखल  करण्यात  आलेल्याचे  नाव असून त्यास सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे.

पीडित मुलगी शाळेत शिकत असून  तिला शिक्षकांनी शाळेच्यावतीने गणवेशासाठी पैसे मिळणार असून फी माफ होणार आहे. त्यामुळे बँकेत खाते उघडून पासबुक काढून आणण्यास सांगितले  होते.  त्यामुळे  ती मुलगी  गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गावात शेजारी राहणार्‍या महिलेबरोबर धनाजी कोळेकर याच्या घरी फोटो घेऊन गेली होती. धनाजी कोळेकर  हा  राष्ट्रीयीकृत  बँकेत गावातील लोकांची खाती काढून देण्याचे  काम करतो. त्यावेळी धनाजीने त्या मुलीसोबत आलेल्या महिलेला जाण्यास सांगून नंतर तिचे फोटो काढले व तिचा विनयभंग केला म्हणून सलगर वस्ती पोलिस ठाण्यात पीडित मुलीने अ‍ॅट्रॉसिटी व द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन सेक्सुअल ऑफसेन्स कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धनाजी कोळेकर याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.