होमपेज › Solapur › पैसे घेऊन मुलीचा लैंगिक छळ; मुंबईच्या दोघांवर गुन्हा दाखल

पैसे घेऊन मुलीचा लैंगिक छळ; मुंबईच्या दोघांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:33PMसोलापूर : प्रतिनिधी

मेडिकलला  प्रवेश  घेऊन  देतो असे सांगून सोलापूरच्या माय-लेकीकडून 75 लाख रुपये घेऊन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबईच्या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ नायडू आणि गोविंद नायडू (रा. अनंतवाडी, भुलेश्‍वर, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली आहे.

यातील पीडित अल्पवयीन मुलीला मेडिकलसाठी प्रवेश घ्यायचा असल्याने तिच्या नातेवाईकांचा नायडूंशी संपर्क झाला. त्यावेळी नायडूंनी त्या मुलीच्या नातेवाईकांकडून  फेब्रुवारी 2017 पासून ते नोव्हेंबर 2017 याकालावधीत वारंवार पैसे पाठविले. त्यानंतर एकेदिवशी पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या कारमधून साईनाथ नायडू व गोविंद नायडू हे दोघे तिच्या सोलापुरातील घरासमोरील गेटजवळ आले होते. त्यावेळी ती मुलगी तिची आई या दोघी कारजवळ गेल्या आणि नायडूंना तुमच्याजवळ मेडिकल प्रवेश प्रकियासाठी यंत्रणा नाही, तुम्ही खोटे बोलून पैसे घेतले असे म्हणाल्या. त्यावेळी नायडूंनी त्या मुलीला व तिच्या आईला कामाचे राहू द्या, तुमचा जीव कसा वाचवायचा ते बघा, नाहीतर तुमच्या जीवाचे बरेवाईट  होईल, मी काहीही करु शकतो असे म्हणून त्या मुलीशी अश्‍लिल चाळे करुन तिच्या वडिलांना कारमध्ये बसवून निघून गेले.  त्यानंतर त्या मुलीचे वडील परत आल्यानंतर त्यांना नायडूंनी जाता जाता पैसे मागितले. पैसे दिले नाही तर अवघड होईल, अशी धमकी दिली. त्याचदिवशी त्या मुलीच्या वडिलांनी नायडूंच्या बँक खात्यावर 20 हजार रुपये पाठविले. अशाप्रकारे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आतापर्यंत नायडूंना सुमारे 75 लाख रुपये पाठविले आहेत म्हणून अखेर याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.