Thu, Nov 22, 2018 01:32होमपेज › Solapur › अग्‍निशामक अधिकार्‍यांसह सातजणांना ७० हजारांचा दंड

महापालिकेच्या क्‍वॉर्टर्समध्ये पोटभाडेकरू ठेवल्याप्रकरणी

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:47PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका अग्‍निशामक दलासाठीच्या वसाहतीमध्ये आपले क्‍वार्टर्स दुसर्‍याला भाड्याने दिल्याच्या प्रकरणात अग्‍निशामक दलाच्या अधिकार्‍यांसह सातजणांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्‍तांनी दिले होते. त्यानुसार सातजणांना प्रत्येकी दहा हजार प्रमाणे 70 हजार दंड करण्यात आला आहे.

अग्‍निशामक दल हे खूप महत्त्वाचे खाते असून आपत्कालीन परिस्थितीत या खात्याचे काम महत्त्वाचे आहे. शहरात कुठेही आग लागली अथवा कोणतेही संकट कोसळल्यास अग्‍निशामक दलास पाचारण करण्यात येते. अशा प्रसंगात अग्‍निशामक  दलाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. या विभागात काम करणारे कर्मचारी 24 तास कर्तव्यावर असतात. कोणतीही आपत्कालीन घटना सांगून होत नसल्याने या विभागातील कर्मचार्‍यांना तातडीने हजर राहता यावे यासाठी राजेंद्र चौक आणि होटगी रोडवरील अग्‍निशामक केंद्राच्या येथे कर्मचार्‍यांना राहण्यासाठी क्‍वार्टर्स बांधण्यात आले आहेत.

या क्‍वार्टर्समध्ये संबंधित कर्मचार्‍यांनी राहणे बंधनकारक आहे. परंतु अग्‍निशामक दलाचे अधिकारी केदार आवटे यांच्यासह सातजणांनी आपल्या क्‍वार्टर्समध्ये पोटभाडेकरू ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयुक्‍तांनी संबंतिधांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्याचे आदेश बैठकीत दिल्यानुसार कारवाई झाली आहे.प्रत्यक्षात आयुक्‍तांकडून कारवाईसंदर्भात जे निर्देश येतील त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.