Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Solapur › शाळकरी मुलीची छेड काढून लैंगिक छळ

शाळकरी मुलीची छेड काढून लैंगिक छळ

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 9:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शाळकरी   मुलीची छेड काढून तिचा लैंगिक छळ करणार्‍या तरुणाविरुद्ध  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन अनिल लांबतुरे (रा. लक्ष्मीनगर, लक्ष्मी पेठ, देगाव रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.  याबाबत पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे.यातील पीडित मुलगी ही शाळेमध्ये शिकत असून गेल्या आठ महिन्यांपासून निरंजन लांबतुरे हा सतत तिचा पाठलाग करुन छेडछाड करीत होता. जाता-येता त्या मुलीला पाहून शिट्ट्या वाजवित होता तसेच लांबतुरे याने  त्या मुलीच्या समोर मोटारसायकल आडवी घालून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे लांबतुरे हा पीडित मुलीचा लैंगिक छळ करीत होता म्हणून  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. पैशासाठी विवाहितेचा छळ; पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल घर घेण्यासाठी माहेराहून 5 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह पाचजणांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहेसीन अब्दुल रहमान कन्नूर (वय 28, रा. बानेगर प्लाझा, समतानगरजवळ, विजापूर रोड, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती अ. रहमान रऊफ कन्नूर (वय 30), सासरे रऊफ अहमद कन्नूर (वय 63), सासू आबेदा रऊफ कन्नूर (वय 55), नणंद सदरू रऊफ कन्नूर (वय 28), नणंद सना समीर शेख (वय 33, रा. सिरतनगर, होटगी रोड, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहेसीन कन्नूर हिस तू नोकरी करायची नाही, मोबाईल वापरायचा नाही, माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवायचा नाही तसेच नवीन वेगळे घर घेण्यासाठी माहेराहून 5 लाख रुपये आण म्हणून पती अ. रहमान कन्नूर व त्याच्या घरातील लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक कलाल तपास करीत आहेत.