Thu, Jan 17, 2019 00:43होमपेज › Solapur › कल्याण पडाल आत्महत्या प्रकरण संतोष संगाला पोलिस कोठडी

कल्याण पडाल आत्महत्या प्रकरण संतोष संगाला पोलिस कोठडी

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 23 2018 12:03AMसोलापूर : प्रतिनिधी

‘म्होरक्या’ चित्रपटाचा निर्माता कल्याण पडाल यांच्या आत्महत्येप्रकरणी जेलरोड पोलिसांनी अट्टल गुन्हेगार श्रीनिवास संगा याच्या भावास  अटक  केली  असून, न्यायालयाने  त्यास  25  मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. संतोष  ऊर्फ  पिंटू  किशोर संगा (वय 27, रा.विजयनगर, न्यू  पाच्छा पेठ) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. याबाबत कल्याण पडाल यांची पत्नी रेणुका  कल्याण पडाल  यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर अट्टल गुन्हेगार व खासगी सावकार श्रीनिवास संगा, खासगी सावकार संतोष  बसुदे  हे  अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

13 मे रोजी संतोष संगा हा कल्याण पडाल यांच्यावर नजर ठेवून होता. ज्यावेळी सकाळी कल्याण पडाल हे  घरी आले त्यावेळी लगेचच श्रीनिवास संगा व संतोष बसुदे हे  दोघे  चारचाकी गाडीतून आले  व  त्यांनी कल्याण पडाल यांना  घरातून  जबरदस्तीने उचलून नेऊन खरेदीखत करून रात्री उशिरा  सोडले. त्यामुळे संतोष संगा हा पडाल यांच्यावर नजर ठेऊन होता, हे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने संतोष संगा यास सोमवारी रात्री जलेरोड पोलिसांनी अटक केली.मंगळवारी दुपारी संतोष संगा यास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस उपनिरीक्षक जंगम तपास करीत आहेत.