Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Solapur › रड्डेच्या सरपंचपदी संजय कोळेकर

रड्डेच्या सरपंचपदी संजय कोळेकर

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 28 2018 10:40PMरड्डे : वार्ताहर

संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या रड्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय कोळेकर निवडूण आले आहे. या निवडणुकीत सुरेश कांबळे यांच्या पॅनेलने सरपंचपदासह  9 जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्या ताब्येत घेतली आहे. 

रड्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. रविवारी याकरिता मतदान झाले होते तर सोमवारी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सरपंचपदासह  विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे  आहे. सरपंचपद संजय नागाप्पा कोळेकर (विजयी 1610 मते), रोहिदास सदाशिव कांबळे (969 मते), सुनिता बाळू सुपनर(251मते), बिरुदेव भाऊसो सप्ताळे (18मते), नोटा (12 मते ) पडली आहेत. तर प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

वसंत सखाराम कांबळे (विजयी 523), विरुद्ध दत्ता रामचंद्र बनसोडे (300 ), शंकर महादेव शिवशरण(32 ),चंद्रकांत तम्मा कोकरे(विजयी452 ) विरुद्ध काकासो शंकर थोरबोले (375), सुखदेव मोकिंदा सुपनर(28 ), कोमल मोहन सांगोलकर( विजयी 491 ) विरुद्ध कमल नामदेव थोरबोले (364) तर प्रभाग क्रमांक 2 मधून ताई बंडू सप्ताळे (विजयी 298 ) विरुद्ध शीला काशिनाथ सप्ताळे(262), भाग्यश्री शिवाजी थोरबोले(विजयी 254) विरुद्ध सुमन धोंडिबा भिसे(247), कामाबाई रावसाहेब माने (104 ), तर प्रभाग क्रमांक 3 मधून सचिन नारायण कांबळे (विजयी 382 ) विरुद्ध ज्ञानेश्‍वर कांबळे (298), जगनाथ बलभीम खांडेकर(विजयी 371 ) विरुद्ध उत्तम भीमराव लेंगरे( 283), समाधान मोकिंदा सुपनर(25 ), अर्चना लक्ष्मण क्षीरसागर( विजयी373 ), विरुद्ध पार्वती बाबासाहेब कांबळे (313)  तर प्रभाग क्रमांक चार मधून विजय कृष्णदेव सांगोलकर (विजयी 312 ) विरुद्ध ज्ञानोबा कलाप्पा नवत्रे (310), युवराज मनोहर कोळेकर(98 ), लक्ष्मी प्रकाश कसबे (विजयी 393 ), विरुद्ध रखमाबाई कांबळे(314 ), रंजना प्रकाश कोळेकर (विजयी433 )विरुद्ध सुमन पांडुरंग थोरबोले(280) यामध्ये सुरेश कांबळे यांचे 9 सदस्य तर सुरेश कोळेकर यांचे 2 सदस्य निवडून आले आहेत.निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांना आ.भारत भालके यांच्या कार्यालयास भेट देऊन जल्लोष साजरा केला.