Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सांगोलेकर शिवशाही बसच्या प्रतीक्षेत

सांगोलेकर शिवशाही बसच्या प्रतीक्षेत

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 8:52PMसांगोला: वार्ताहर 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी नव्याने शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर आगाराच्या शिवशाही बसेस मोठ्या थाटात धावताना दिसत आहेत. परंतु, सांगोला आगारास  शिवशाही बसेस अद्यापही आल्या नसल्यामुळे  सांगोला आगारात शिवशाही बसेस येणार कधी? असा सवाल प्रवासी वर्गांमधून उपस्थित केला जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील एक कार्यक्षम व उत्कृष्ठ आगार म्हणून सांगोला आगाराची ओळख आहे. परंतु आजही आगारातील अनेक बसेसची स्थिती फारसी समाधानकारक नाही. अनेक वेळा खुळखुळ्या बस मधून प्रवास करून डोके झाले बधीर अशा प्रतिक्रिया प्रवासी वर्गांमधून व्यक्‍त केल्या जातात. खाजगी प्रवासी वाहतुकीने  सध्या एस.टी. महामंडळा पुढे मोठे आव्हान उभारत आहेत. अत्याधुनिक सेवा-सुविधा व जलद  सेवा देत एक वेगळाच जम खाजगी प्रवासी वाहतुकीने बसविला आहे. तरीपण ग्रामीण भागाची वाहिणी म्हणून एसटीची अर्थात लालपरीची ओळख आहे त्याच्याविषयी आजही लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात विश्‍वसनियता व आत्मीयता आहे. 

तालुक्यातून मुंबई, पुणे यासह इतर मोठ्या शहरात ये- जा करणार्‍या प्रवासी वर्गांची संख्या मोठी आहे. परंतु, बसेस मात्र फारशा सुस्थितीत नाही. तरी मुंबई, पुणे यासह पणजी, सोलापूर- कोल्हापूर या व इतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगल्या सुस्थितीतल्या बसेस मिळाल्यास प्रवासी संख्याही वाढेल. साहजिकच यामुळे उत्पन्नात आणखीन भर पडेल.  सांगोला बसस्थानकात सध्या इतर आगारातून काही शिवशाही बसेस ये-जा करीत आहेत. परंतु सांगोला आगारात मात्र शिवशाही बस नसल्यामुळे प्रवासीवर्गांमधून या बसची मागणी होत आहे. या बस चालू झाल्यास ज्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवासी वर्गांची मोठी ये-जा असते. त्या मार्गावर अशा बसेस नक्कीच चांगल्या पद्धतीने चालतील. 

वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बसमध्ये आरामदायी खुर्च्या व वातावरण असल्यामुळे नक्कीच प्रवासीवर्गाला याचा फायदा होईल. तरी सांगोला आगारास लवकरात लवकर शिवशाही बसेस मिळाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.