होमपेज › Solapur › सोलापूर : मंगळवेढ्यात वाळू तस्‍करीविरोधी मोठी कारवाई

सोलापूर : मंगळवेढ्यात वाळू तस्‍करीविरोधी मोठी कारवाई

Published On: Mar 11 2018 12:07PM | Last Updated: Mar 11 2018 12:07PMमंगळवेढा : प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील तामर्दडी परिसरातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती समजताच रविवारी पहाटे तीन वाजता सोलापूर येथील वाळू तस्करी विरोधी पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने धाड़ टाकली असुन त्यात २० ट्रॅक्टर १० पेक्षा अधिक टिपर ट्रक  जेसीबी सहित चार दुचाकी वाहने आणि शेकडो ब्रास वाळू साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आणि सहकारी घटनास्थळी रवाना झाले असून अद्याप महसुलचे कोणतेही अधिकारी तिथे पोहचले नाहीत.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरु झाली असुन रात्रभर बेसुमार वाळू उपसा केला जातो आहे. त्यामुळे तालुका वाळू तस्करीचे माहेरघर बनल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.