Wed, Jul 08, 2020 00:42होमपेज › Solapur › बार्शीत संभाजी महाराज जयंती उत्साहात

बार्शीत संभाजी महाराज जयंती उत्साहात

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:58PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी शहर व तालुक्यात संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बार्शी नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. 

पांगरी (अयोध्यानगर) पांगरी, ता. बार्शी येथील अयोध्यानगर भागात छत्रपती संभाजी महाराज जयंती संभाजी ब्रिगेडतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष बडे, सरपंच युन्नुस बागवान, उपसरपंच रामभाऊ गाढवे, धनंजय तौर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लाडे, विश्‍वास देशमुख,  अजित पोफळे, गणेश गोडसे, सचिन ठोंबरे, अनिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष अविनाश पोफळे, उपाध्यक्ष ऋषिकेश काळे, खजिनदार बालाजी गाढवे, सचिव अरबाज मुलाणी, प्रतिक घोडके, अक्षय सुरवसे, संदीप गाढवे, यश जगताप, अजय माने, शिवप्रसाद घोडके, अभिषेक जगताप, आकाश जगताप, अमोल काकडे, समाधान क्षीरसागर, अमित सुरवसे, सूरज पोफळे, सचिन पोफळे, महेश घोडके आदींनी परिश्रम घेतले. 

गुळपोळी
 गुळपोळी येथेही महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी गुलाब शेख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे बार्शी तालुका उपाध्यक्ष गणेश लंगोटे, पोलिस पाटील बाळासाहेब पिसे, संभाजी ब्रिगेड मालवंडी शाखा अध्यक्ष किरण कदम उपस्थित होते. गुलाब शेख व गणेश लंगोटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, उपाध्यक्ष रणजित चौधरी, प्रवीण पाडुळे, कमलेश चौधरी, किरण खुरंगळे, श्रीकांत चिकणे, औदुंबर सावंत, राजेंद्र मचाले आदी उपस्थित होते. 

नारी ग्रामपंचायत
नारी, ता. बार्शी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती  शंभूराजे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पोलिस पाटील वैभव माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सरपंच रामभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य अमोल रानमाळ, अमित कदम, राकेश पाटील, विकास बदाले, विनोद कदम, सागर बारंगुळे, सुजित बदाले, दादा कुरुंद यांच्यासह गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाभुळगाव 

बाभुळगाव, ता. बार्शी येथील छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजीराजे महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त 14 मे रोजी सकाळी सरपंच किरण शिंदे, उपसरपंच चैतन्य शिंदे, माजी सरपंच श्रीरंग शिंदे, अविनाश शिंदे यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. सायंकाळी सुहास जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 15 मे रोजी  सायंकाळी केमदाने महाराज यांचे कीर्तन, 16 मे रोजी मिरवणूक, 17 मे रोजी सायंकाळी भारुडाचा कार्यक्रम, 18 मे रोजी शिवचरित्रकार खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान, 14 मे ते 6 जूनपर्यंत 5000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

सुर्डी 
सुर्डी, ता. बार्शी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपनिरीक्षक अनिल शेळके होते. प्रतिमा पूजन पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर लंबे व अनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांनी शंभूराजेंप्रमाणे निर्व्यसनी राहाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन डोईफोडे यांनी, तर आभार लहू माळी यांनी मानले. कार्यक्रमावेळी सुदर्शन वांगदरे, आनंद खुने, आशुतोष शेळके, समाधान डोईफोडे, गोपाळ बरबडे, अमित शेळके, सागर बंडगर, कृष्णाथ शेळके, प्रल्हाद दौंड, बालाजी शेळके, चंद्रकांत खुने व समस्त शंभूप्रेमी उपस्थित होते.