Sun, May 26, 2019 18:54होमपेज › Solapur › सोलापूरची ब्रिगेड खेडेकरांसोबतच!

सोलापूरची ब्रिगेड खेडेकरांसोबतच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांवर चालणारी असून या पुढेही संघटना त्यांच्या पाठिशीच राहणार असल्याचा निर्वाळा सोलापूर शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शाम कदम यांनी दिला आहे.

मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडमधून एक गट बाहेर पडला आहे. या नव्या गटाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड असणार आहेत. मात्र नव्या गटाने संभाजी ब्रिगेड असे नाव वापरू नये, असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.मनोज आखरे गटाने प्रवीण गायकवाड आणि शांताराम कुंजीर यांच्याविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांनी बाहेर पडलेल्या गटाचे अध्यक्ष तेच असतील, असा दावा त्यांनीच केला. तर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याचेही त्यांनी जाहीर केले.

संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते. पण नंतर अंतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे मनोज आखरे या नव्या अध्यक्षांनी ब्रिगेडची नोंद राजकीय पक्ष म्हणून केली होती. काही काळ शेकापमध्ये गेल्यानंतर  प्रवीण  गायकवाड यांनी पुन्हा संभाजी ब्रिगेडचा सामाजिक संघटना म्हणून झेंडा हाती घेतला आहे. मात्र त्यांनतर त्यांनी बाहेर पडून आपण संघटनेचे अध्यक्ष असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यभर उमटले असून संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे खरी संघटना कोणती आणि सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी आता नेमके कोणाच्या मागे जायचा, असा विषय चव्हाट्यावर आला असून  काही लोकांनी प्रवीण गायकवाड यांच्यासोबत, तर काही लोकांनी पूर्वीच्या संघटनेबरोबर अर्थात पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचाराने चालण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे एकंदरीतच संभाजी ब्रिगेडमध्ये पडलेली फूट ही राजकीय हव्यासा पोटी पडलेली आहे. त्यामुळे यापुढे राजकारण विरहीत एक ज्वलंत सामाजिक संघटना म्हणूनच संभाजी ब्रिगेड काम करेल, असा विश्‍वास कदम यांनी व्यक्त केला आहे.

Tags : Solapur, Solapur News, solapur, brigade, khed village, Sambhaji Brigade


  •