Fri, Jul 19, 2019 21:58होमपेज › Solapur › सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील द्रष्टे नेतृत्व होते : पवार

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील द्रष्टे नेतृत्व होते : पवार

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:22PM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका प्रतिनिधी

शेतकर्‍यांवर ज्यावेळी संकट येते त्यावेळी राज्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे, हीच भूमिका सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची होती.   दुष्काळी जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मालकीचा पहिला कारखाना उभारणारे सहकारमहर्षी हे उत्तम संघटक व द्रष्टे नेतृत्व होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  खा. शरद पवार यांनी व्यक्‍त केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री    सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सिद्धराम म्हेत्रे, आ. दिलीप सोपल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, आ. बबनराव शिंदे, आ. नारायण पाटील, आ. दत्तात्रय सावंत, दीपक सावंत, कल्याणराव काळे, माजी. खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना  खा. पवार म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळ मुंलींना वसतीगृहासह  उत्तम   शैक्षणिक सुविधा देत आहे. या  संकूलात जगात भारताची प्रतिष्ठा वाढविणारी महिला घडेल अशी आशा व्यक्‍त करून देशात व राज्यात परिर्वतनाची गरज आहे. सर्वांनी एकत्र राहून या परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करावी अशीही अपेक्षा खा.पवारांनी व्यक्‍त केली. 

प्रस्ताविकात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, 1948 साली सहकार महर्षींनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. काळानुसार नवीन आधुनिक महाविद्यालये सुरू केली.संख्यात्मक वाढी बरोबरचगुणात्मक वाढीसाठी प्रयत्न केले.माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारीचा पाया सहकार महर्षींनी रचला.माझ्या उमेदीच्या काळात मी अनेकदा शकररावांचा सल्ला घेत असे. राजकारणात  गरिबीतून वर आलेल्या, लोकसहभागातून विकासाचे वैभव उभे करणार्‍या सहकार महर्षींना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील. आ. हणमंतराव डोळस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीही भाषणे झाली. आभार रत्नाई संकुलच्या सभापती व जि.प.सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी मानले.