Sat, Nov 17, 2018 08:45होमपेज › Solapur › बांडगुळांना मी घाबरत नाही : सदाभाऊ (Video)

बांडगुळांना मी घाबरत नाही : सदाभाऊ (Video)

Published On: Feb 24 2018 5:13PM | Last Updated: Feb 24 2018 5:31PMसोलापूर : प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदारसंघातील रिधोरे येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभीमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ,‘असा भ्याड हल्ला करण्याऱ्या बांडगुळांना मी घाबरत नाही.’  अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी हल्ल्यानंतर दिली.

वाचा : सोलापुरात 'स्वाभिमानी'ने सदाभाऊ खोतांची कार फोडली (Video)

यावेळी बोलताना सदाभाऊ म्हणााले की,‘स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजकारणात ते भ्याड हल्ला करण्याइतक्या खालच्या पातळीवर उतरले आहे. अशा बांडगुळांना मी घाबरणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्राण गेला तरी चालेल.’ यानंतर ते बाशीकडे पुर्व नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

या प्रकारानंतर कुर्डूवाडी पोलिसांनी स्वाभिमानीच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर ना. सदाभाऊ खोत हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बार्शीकडे रवाना झाले.