Mon, Apr 22, 2019 01:49होमपेज › Solapur › सचिन कलुबरमे ह्त्या प्रकरण: बाबा नाईकवाडीस 7 दिवसांची पोलीस कोठडी

सचिन कलुबरमे ह्त्या प्रकरण: बाबा नाईकवाडीस 7 दिवसांची पोलीस कोठडी

Published On: Apr 27 2018 8:36PM | Last Updated: Apr 27 2018 8:37PMमंगळवेढा (सोलापूर) : तालुका प्रतिनिधी

सचिन कलुबरमे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या बाबासाहेब नाईकवाडी आणि विशाल उन्हाळे यास शुक्रवारी मंगळवेढा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हत्येप्रकरणातील तपास करण्यासाठी त्यांना 3 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास संशयित आरोपींना मंगळवेढा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायाधीश एम बी आसीजा यांनी आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फरारी आरोपींचा तपास करणे, गुन्हा करताना वापरलेले शस्त्र जप्त करणे, सदर आरोपीस गुन्हा घडवल्यानंतर फरार करण्यास कोणी मदत केली याप्रकरणातील चौकशीसाठी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

यात विशाल उन्हाळे हा फिर्यादीत नव्हता मात्र प्रदीप पडवळे यांनी दिलेल्या सुधारीत माहितीवरून त्याला सह आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान जी पथके नेमण्यात आली आहेत त्यांचा तपास सुरू आहे मात्र, अद्याप उर्वरित आरोपींना शोधण्यात यश आलेले नाही.

Tags : Sachin Kalubarhi,  Murder, Baba Naikwadi, Vishal Undhale, Police Custody, Solapur