Fri, Feb 22, 2019 22:37होमपेज › Solapur › तुंगतकरांना रास्तारोकानेे थांबवावी लागते एस.टी.

तुंगतकरांना रास्तारोकानेे थांबवावी लागते एस.टी.

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:19PMतुंगत : संजय रणदिवे

 पंढरपूर-मोहोळ रोडवर पंढरपूर पासून 15 कि मी.अंतरावर असलेल्या तुंगत येथे एस.टी.महामंडळाच्या सर्व बसनां प्रवासी चढ उतार करण्यासाठी थांबा असूनही केवळ चालक-वाहकांच्या असहकार्यामुळे येथील प्रवाशानां रोजच एस टी अडवून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पास काढलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे मात्र अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. तुंगत येथून अनेक शाळा, महाविदयालयात शिक्षण घेण्यासाठी तर काही नौकरी,व्यवसायानिमित्त एस. टी. ने प्रवास करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर प्रवासी मासिक पास घेऊन दररोज ये - जा करतात. पंरतु चालक-वाहकांच्या आडमुठे पणामुळे तिकिट मशिनमध्ये तुंगतचे सेटिंग नाही, स्टॉप नाही, जागा नाही,लांब पल्ल्याची गाडी आहे वैगरे कारणे सांगत प्रवाशी घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. असा रोजच त्रास होऊ  लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेकदा पंढरपूर, सोलापूर एस. टी.आगारप्रमुुखांना निवेदन देऊनही काही उपयोग झाला नाही.

गेल्या महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.त्यावेळी महामंडळाचे अधिकारी एन.बी जाधव यांनी यापुढे तुंगत येथे सर्व गाड्या थांबतील असे आश्‍वासन दिले होते.

पुढे 3-4 दिवस एस. टी .चे कर्मचारी येथून प्रवासी गाडीत पाठवू लागले. मात्र आता कर्मचारीही थांबत नाही  आणि एस. टी. ही थांबत नाही. न विचारता गाडीत बसल्यास तुंगतच्या प्रवाशांना पुढील थांब्याचे तिकीट घेऊन आर्थिक भूर्दंड सोसून प्रवास करावा लागत आहे. असे का म्हणून विचारले असता वाहकांकडून अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागत आहे. याकारणाने येथील विद्यार्थी, पालक, नागरिक खूप संतापले असून महामडळाने सक्तीने सर्व गाड्यानां थांबा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुंगत येथील ग्रामस्थांनी दिला आहे.