होमपेज › Solapur › एसएफआयतर्फे धरणे आंदोलन

एसएफआयतर्फे धरणे आंदोलन

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:26PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने (एसएफआय) मंगळवारी विविध शैक्षणिक मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
एसएफआयतर्फे 1 ते 12 डिसेंबरदरम्यान राज्यभरात शिक्षण हक्‍क मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत असून  याचाच एक भाग म्हणून मंगळवारी एसएफआयच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी दिलेल्या निवेदनात राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा (स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, ग्रंथालय, खेळाचे व  प्रात्यक्षिक साहित्य इ.) उपलब्ध करून द्या, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ओबीसी-एनटी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करा, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा, नितीन आगे या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी राज्य शासनाने कोर्टात जाऊन त्याला व कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, आयटीआय परीक्षेतील नकारात्मक गुणपध्दती रद्द करून  प्रश्‍नपत्रिका मराठीतून द्यावी, प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

यावेळी राज्य उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव मीरा कांबळे, जिल्हाध्यक्ष मलेशम कारमपुरी, राज्य कमिटी सदस्य किशोर झेंडेकर, राहुल जाधव, शामसुदंर आडम, नम्रता निली, रामकृष्ण ताटीपामूल, साहेबलाल हिरापुरे, गणेश भोईटे, पल्लवी मासन, शहनवाज शेख, मुस्तफा बागवान आदी उपस्थित होते.