Thu, Aug 22, 2019 04:33होमपेज › Solapur › जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

Published On: Feb 12 2019 1:10AM | Last Updated: Feb 12 2019 1:10AM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात भर दिवसा जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांच्या टोळीला अटक करून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

गुन्हे शाखेचे पोलिस उप निरिक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणार्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, माशाळ वस्ती ते राजस्व नगर रोडवर एका रिक्षातून प्रवास करणार्‍या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून चोरी करणारे दोन इसम हे गुन्ह्यातील वापरलेल्या लाल रंगाच्या एचएफ डिलेक्स या मोटरसायकलसह जुना विजापूर नाका येथे येणार आहेत अशी माहिती खबर्‍याने खेडेकर यांच्या पथकाला दिली. 

खबर्‍याच्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी खरबर्‍याने सांगितलेल्या दुचाकीवरून दोन इसम जुना विजापूर नका येथभल राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या गेट समोर असलेल्या मोकळ्या मैदानातून येताना दिसले. त्यावेळी पथकाने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आकाश उर्फ आक्या चंद्रकांत जाधव (वय २५, राहणार शहानगर हौसिंग सोसायटी, वांगी रोड, सोलापूर ) व दीपक उर्फ दिपू गंगाधर कोकणे ( रा. गरीबी हटाव झोपडपट्टी, संजय गांधी नगर, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सजंय उर्फ सचिन बिभीषण कसबे (वय २२, रा. गरीबी हटाओ, संजय गांधी नगर, सोलापूर) या साथीदारच्या मदतीने दोन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबूल दिली. त्यानंतर या दोघांना अटक करून, त्यांच्याकडील दोन मोबाईल, लहान मुलांच्या पायातील पैंजण व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १३ डीडी ०५१२) या क्रमांची दुचाकी जप्त केली आहे. 

ही कारवाई पोलिस उप निरिक्षक खेडेकर, सहाय्यक फौजदार जयंत चवरे, अशोक लोखंडे, संजय बायस, शंकर मुळे, राजू चव्हाण, सचिन होटकर, संतोष येळे, सुहस अर्जून, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, कफील पिरजादे यांनी केली.