Tue, Nov 20, 2018 01:38



होमपेज › Solapur › बार्शीतील तावडी गावात दरोडा, लाखोचा ऐवज लुटला

बार्शीतील तावडी गावात दरोडा, लाखोचा ऐवज लुटला

Published On: Mar 08 2018 1:28PM | Last Updated: Mar 08 2018 1:28PM



बार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील तावडी येथे दरोडखोरांनी सोन्या चांदिच्या दागिण्यांसह लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. .ही घटना बुधवारी मध्यरात्री तावडी येथील गादेकर यांच्या घरी घडली. सहा दरोडेखोर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ माजली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, स.पो.नि.धनंजय ढोणे घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.