Thu, Sep 20, 2018 01:54



होमपेज › Solapur › ऊसदर प्रश्नी रस्तारोको आंदोलन (व्हिडिओ)

ऊसदर प्रश्नी रस्तारोको आंदोलन (व्हिडिओ)

Published On: Dec 05 2017 5:42PM | Last Updated: Dec 05 2017 5:43PM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

मोडनिंब येथे ऊसदर प्रश्नी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील ऊसदरप्रश्नी विविध शेतकरी संघटनांच्यावतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याने एफआरपी अधिक चारशे रुपये दर देण्याचे जाहीर केले होते

जिल्ह्यातील अन्य कारखानदारांनी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेचे नेते भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोडनिंब येथे, आज मंगळवारी ऊसदरप्रश्नी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी तातडीने माढ्यातील साखर कारखानदार यांनी ठरल्याप्रमाणे उचल जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.