Wed, Jan 23, 2019 16:54होमपेज › Solapur › सोलापूर : ऊसदरासाठीचे आंदोलन रोखल्याने रास्ता रोको 

सोलापूर : ऊसदरासाठीचे आंदोलन रोखल्याने रास्ता रोको 

Published On: Dec 02 2017 3:43PM | Last Updated: Dec 02 2017 3:43PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील लोकनेते कारखान्याने एफआरपी प्लस चारशे रुपयांचा दर द्यावा. येत्या आठवडयात ऊस दर जाहीर न केल्यास लोकनेते कारखान्यावर गनीमी काव्याने अंदोलन करण्याचा इशारा जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिला.

लोकनेते कारखान्यावर मोर्चा घेऊन जात असताना भैया देशमुख यांना पोलीसांनी रोखले. त्यावेळी भैया देशमुख यांनी त्याच ठिकाणी रस्ता रोको केला यावेळी त्यांनी लोकनेते कारखान्याचे संस्थापक तथा जिम बँकेचे चेअरमन राजन पाटील यांच्यावर कटू शब्दात टीका केली. पोलीस प्रशासनाने दुजाभाव करत आम्हाला रोखुन कारखानदारांची पाठराखण केल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी तासभर वाहने रोखुन धरत रास्ता रोको अंदोलन केले. देशासाठी लढणाऱ्या एका शहीद जवानाचे पार्थीव घेऊन जाणाऱ्या वाहनाला रस्ता खुला करून देण्यासाठी हे अंदोलन थांबवण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार किशोरसिंह बडवे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के यांनी सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला होता .