Wed, Jan 16, 2019 17:35होमपेज › Solapur › बंदुकीसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निवृत्त जवानाचा प्रयत्न

बंदुकीसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निवृत्त जवानाचा प्रयत्न

Published On: May 19 2018 10:52PM | Last Updated: May 19 2018 10:52PMपंढरपूर  :  प्रतिनिधी

पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकाने बंदुकीसह मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला. याबाबत शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिलेली माहिती अशी की, अधिक मास व उन्हाळी सुट्टीमुळे सध्या पंढरपुरात भाविकांची गर्दी आहे. शनिवारी सकाळी सांगली येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविकाने बंदुक घेवून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत बंदुक जमा करुन घेतली. 

करोली टी(ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ) येथील अण्णाप्पा अप्पासो पाटोळे हे शनिवारी सकाळी दर्शनासाठी आले होते. पाटोळे हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांच्याकडे परवानाधारक बंदुक आहे. मात्र पोलिसांनी पाटोळे यांना परवान्याची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले असून तोपर्यंत ही बंदुक शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याचीही माहिती दबडे यांनी दिली.