Tue, May 21, 2019 00:56होमपेज › Solapur › विराज मोहितेंची रायफलमधूनगोळी झाडून घेऊन आत्महत्या

विराज मोहितेंची रायफलमधूनगोळी झाडून घेऊन आत्महत्या

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:24PMरेठरे बुद्रुक : प्रतिनिधी

रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे युवकाने शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. विराज हिंदुराव मोहिते (वय 38) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मोहिते-भोसले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे संपूर्ण रेठरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
विराज मोहिते हे रेठरे बुद्रुक-पवार मळा येथील आपल्या बंगल्यामध्ये कुटुंबीयांसह राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून तेे निराश होते. विराज मोहिते रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बंगल्यातील हॉलमधील सोफ्यावर बसले होते. अचानकपणे हॉलमधून मोठा आवाज आल्याने  भाऊ आदित्यसह सर्वांनीच हॉलकडे धाव घेतली. त्यावेळी विराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. विराज मोहिते यांनी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. रायफलचा परवानाही विराज यांच्याच नावे आहे. त्यांनी गळा व हनुवटीच्यामध्ये रायफल धरून त्यातून वर कवटीच्या दिशेने गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विराज मोहिते हे यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, कारखान्याचे  विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांचे चुलतभाऊ होत. तर, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचे चुलते होत. ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे बंधू हिंदुराव मोहिते यांचे विराज हे चिरंजीव होत.विराज यांच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.