Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Solapur › आरक्षण आंदोलनात राजकीय पक्षांचे सोयीस्कर सुरक्षित अंतर?

आरक्षण आंदोलनात राजकीय पक्षांचे सोयीस्कर सुरक्षित अंतर?

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 8:44PMपानीव : विनोद बाबर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून बंद, रास्तारोको करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षण देण्यात चालू असलेली चालढकल, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना शिक्षा देण्यात होत असलेला विलंब.  यामुळे मराठा समाजाच्या भावना अनावर झाल्या असून औरगांबाद जिल्हयातील काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. तर अन्य दोघांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. त्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे हे गतप्राण झाले तर जयेंद्र सोनावणे यांनी कोरड्या नदीत उडी घेतल्याने गंभीर जखमी झाले. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा भडका उडाला असून  एरव्ही क्षुल्लक गोष्टीवरून प्रतिक्रिया देणारे सर्वच पक्षाचे शीर्ष नेते मात्र यावर मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोपर्डी येथील हत्याकांडानंतर मराठा समाजने संपूर्ण महाराष्ट्रात  मोठ मोठे 58 मोर्चे काढून हत्याकांडातील आरोपींना त्वरित शिक्षा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची मागणी केली. परंतु दोन वर्षे झाली तरी  सरकार फक्‍त चालढकल करत असल्याने याबाबत मराठा समाज कमालीचा नाराज आहे. यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर सकल मराठा 

समाजाने आंदोलन छेडल्याने व आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने पंढरीत कायदा व सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमते घेत महापूजेला  न येण्याचा निर्णय घेऊन आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर हे आंदोलन जास्तच हिसंक होत चालले आहे. अनेक ठिकाणी एस. टी .बसेस फोड़ल्या जात असून काही ठिकाणी तर त्यांना आगीच्या हवाली करण्यात येत आहे.    मराठा आंदोलनास पाठिंबा दिला. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वोट बँकेची काळजी आहे. त्यामुळे कुणीही उघड यात पाठिंबा व्यक्‍त करताना दिसत नाहीत. यामुळे आमदार व खासदाराबद्दल सुद्धा समाजात असंतोष पसरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आता सोक्षमोक्ष लावायचाच. या इराद्याने हा समाज प्रक्षुब्ध झालेला असून सरकार तसेच विरोधी पक्षांनी आपापसात राजकीय खेळ न खेळता यावर त्वरित तोडगा काढणे क्रमप्राप्त आहे.