Wed, Jul 17, 2019 08:08होमपेज › Solapur › उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बदली

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बदली

Published On: Jun 01 2018 10:23PM | Last Updated: Jun 01 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर उपप्रादेशिक परिहवन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची वर्धा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी कोण येणार, या अधिकार्‍याचे नाव मात्र समजू शकलेले नाही. राज्याच्या परिवहन मोटार वाहन विभागातील अधिकार्‍यांच्या  गेल्या  काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु, शुक्रवारी अचानकपणे खरमाटे यांची बदली करण्याचा आदेश आल्याने यामागील गौडबंगाल काही समजू शकलेले नाही.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी 15 जानेवारी 2015 रोजी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.  खरमाटे यांच्या काळात सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार ऑनलाईन करण्यात कार्यालय पूर्णपणे यशस्वी झाले. 96 कोटी रुपये महसूल मिळवून देणार्‍या सोलापूर कार्यालयाने खरमाटे यांच्या कार्यकाळात प्रभावी कारवाई करीत 157 कोटी रुपये महसूल मिळविण्यापर्यंत मजल मारली. तसेच गेल्या तीन वर्षांच्या काळात शहरातील सुमारे 1300 स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करीत त्या मोडून काढून भंगारात विकून सुमारे 50 लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला. तसेच शहर व जिल्ह्यात राज्य शासनाच्या स्कूल बस धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणाने केल्याने शहर व जिल्ह्यात सोलापूर कार्यालयांतर्गत स्कूल बसची  नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.