Tue, Apr 23, 2019 09:39होमपेज › Solapur › मनुवादी इतिहास नाकारून खरा इतिहास अभ्यासा : डॉ. भानुसे                       

मनुवादी इतिहास नाकारून खरा इतिहास अभ्यासा : डॉ. भानुसे                       

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:34PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

शिवरायांचे खरे गुरू छत्रपती शहाजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ व संत तुकाराम महाराज हे असून, आतापर्यंत आपणास खोटा इतिहास शिकविला आहे. यामुळे इतिहासाची शहानिशा करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला घासून खरे काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शिवानंद भानुशे यांनी केले.

संभाजी ब्रिगेड व मित्रप्रेम ग्रुप यांच्या वतीने ‘शिवरायांचे खरे गुरू कोण’ या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. शिवानंद भानुशे  यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. भानुशे हे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,  महापुरुषांना जातीपातीत बांधले जात आहे. यामुळे सर्व बहुजन समाजबांधवांनी एकत्र येऊन महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करावी. मराठ्यांच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलितांच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावण्याचे काम मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने  गेल्या पंचवीस वर्षांपासून करीत आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश जगदाळे, उपाध्यक्ष भारत लटके, नागेश बोबडे, दयानंद महाडिक, नागनाथ वाघे, हरिभाऊ सटाले, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष आशाताई टोणपे, तालुका सचिव सविता जगताप, शहराध्यक्षा अर्चनाताई गाडेकर, श्रीस्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, शीलाताई सटाले, टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास साळुंके, सचिव रघुनाथ बनसोडे, श्रीकांत लोंढे, अ‍ॅड. मंगेश देशमुख, अ‍ॅड.योगेश देशमुख, डॉ. सयाजी देशमुख, नितीन मुळे, सोमनाथ महाडिक, पिंटू देशमुख, शिवाजी देशमुख, राहुल तिपालेआदी उपस्थित होते.