Fri, Apr 19, 2019 08:41होमपेज › Solapur › रश्मीदीदी... एक वादळ... एक आशा...

रश्मीदीदी... एक वादळ... एक आशा...

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 10:56PMरश्मी..
रश्मी या नावातच सगळं काही दडलंय.
रश्मी या शब्दाचा अर्थ होतो ‘किरण’ अर्थात ‘प्रकाश’.
करमाळा तालुक्यातील रंजल्या-गांजलेल्या जनतेच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारा तेजोमय प्रकाश म्हणजेच रश्मीदीदी बागल होय.करमाळा तालुक्याचं नाव सबंध महाराष्ट्रात ज्यांनी गाजवले, ज्यांच्या रूपाने करमाळा तालुक्याला पहिल्यांदा लाल दिवा मिळाला, असे हरितक्रांतीचे प्रणेते कै. दिगंबर बागल मामा आणि माजी आमदार शामलताई बागल यांच्या कुशीत 31 मे 1985 साली दीदींचा जन्म झाला. कै. मामांना दीदींनी प्रशासकीय सेवेत येऊन जनतेची सेवा करावी, असे वाटायचे आणि दीदींनीदेखील त्यादिशेने तयारी सुरू केली होती. परंतु काळाने घात केला आणि अवघ्या 20 व्या वर्षी दीदींचे पितृछत्र हरपले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाईलाजाने राजकारणात प्रवेश करावा लागला.

नुकतीच त्याकाळात मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. ती निवडणूक दीदींच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आणि सर्वात लहान वयात चेअरमनपदी निवड होण्याचा मान मिळवून इतिहास घडला. मकाईचे चेअरमन असताना कारखान्यास उत्कृष्ट साखर उतारा (रिकव्हरी)चा राज्य शासनाचा पुरस्कार मिळवून आपल्या कामाची दीदींनी चुणूक दाखवून दिली. परंतु संघर्ष आणि संकट पाठ सोडत नव्हते. लागलीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि यात स्वकियांबरोबरच जिल्ह्याचे नेतृत्व, तालुक्यातील सर्व पुढारी यांनी एकत्र येऊन या लेकीला राजकारणात घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही मामांची लेक सर्वांना पुरून उरली आणि सर्वच्या सर्व जागा जिंकून विजयी झाल्या. मात्र विरोधकांच्या हातात कारखाना असताना तो देशोधडीला लावण्याचं काम झाले होते तसेच कर्मचार्‍यांच्या 19 महिन्यांचा पगार थकलेल्या होत्या. अशा अवस्थेत कारखाना तर चांगला चालवून दाखवलाच त्याबरोबर कर्मचार्‍यांचा सर्वचा सर्व पगारही अदा केला.

दरम्यान, 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय मामी आमदार असताना जवळपास 900 कोटींचा निधी तालुक्याला खेचून आणला. त्याचदरम्यान मामांनी जे दहीगाव उपसासिंचन योजनेचे स्वप्न पाहिले होते त्या दहीगाव उपसासिंचन योजनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण करण्यात आला होता. परंतु करमाळा तालुक्याचा विकास हा करमाळा तालुक्यातील विरोधकांना आणि आज ती योजना पूर्ण केलीय अशा अविर्भावात फिरणार्‍या नेतृत्वाला नको होता. त्यातूनच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अवघ्या 100 मीटरचे काम अडवून ठेवून कुंभेज आणि परिसराला 5 वर्षे मागे ठेवण्याचं पाप केले.दीदी आणि भैय्यांनी त्या कार्यकर्त्याला विनंती केली. प्रसंगी त्यांना पदरचे पैसेदेखील देऊ केले,  परंतु दहिगाव योजनेचे श्रेय बागल कुटुंबाला मिळू नये म्हणून सारा अट्टाहास विरोधकांनी केला.
दरम्यान, 2014 च्या विधानसभेत स्वकीय आणि दलबदलू काही पदाधिकारी आणि प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने अवघ्या 256 मतांनी निसटता पराभव रश्मीदीदींना स्वीकारावा लागला.

पराभवाने दीदींचे राजकारण संपल्यात जमा आहे, अशी स्वप्न विरोधक पाहात होते. मात्र एका पराभवाने खचेल ती मामांची लेक कसली? दुसर्‍याच दिवसापासून पुन्हा एकदा जनतेत मिसळून त्यांच्या सोबतची टीचभरदेखील नाळ दिदींनी तुटू दिली नाही. दरम्यान, दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेली साखर कारखानदारी आणि सरकारची चुकीची धोरणे यांच्या कात्रीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना सापडला असताना तसेच तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने जर कारखाना त्यावर्षी चालू राहीला तर कमीतकमी 20 कोटींचा तोटा हा कारखान्यास सहन करावा लागणार होता. हे लक्षात घेऊन ऐन निवडणूकपूर्व  हंगाम बंद ठेवून कारखान्याचा 20 कोटींचा तोटा वाचवला. यातून कारखाना, कामगार व शेतकरी या सर्वांचे भले झाले. हा कटू मात्र हिताचा निर्णय सर्वांनीच स्वीकारला. यामध्ये आपल्या राजकीय फायद्याचा विचार न करता कारखान्याच्या भल्यासाठी कटू निर्णय घेऊन आपल्या प्रशासकीय निर्णयक्षमतेची चुणूक दाखवून दिली होती आणि त्याची पावती म्हणूनच पुन्हा एकदा जनतेने निवडून दिले व सत्ताही ताब्यात दिली.

खरंतर सुलतानी आणि अस्मानी संकटांनी घेरलेल्या कारखान्याचा विजय हा मुळीच विजय नव्हता, तर ती सभासदांनी टाकलेली जबाबदारी होती आणि ती जबाबदारी हा हंगाम यशस्वीपणे पूर्ण करून सार्थक करून दाखवली.सुरूवातीला विरोधकांनी वल्गना केल्या. कारखाना बुडेल, कारखाना विक्रीला काढावा लागेल, असे म्हणत शेतकर्‍यांना ऊस घालू नका इथंपर्यंत आवाहन केले. मात्र रश्मी बागलांनी दिग्विजय बागलांना साथीला घेऊन, सर्व संचालकांना विश्‍वासात घेतले व सभासद शेतकर्‍यांना सामोरे गेले. याला शेतकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.कारखाना प्रशासनानेही सर्व कारखान्याच्या तुलनेत ऊस बिले काढून आदर्श घालून विरोधकांच्या तोंडात सणसणीत चपराक मारली.सक्षमपणे कारखाना चालवून नैतिकतेचे राजकारण कसे असते हे दाखवून दिले. अशा या सक्षम नेतृत्वाचा... रश्मीदीदींचा 31 मे रोजी 34 वा

वाढदिवस होतोय. त्यानिमित्ताने एवढंच म्हणेन -
परिंदो को ‘मंजिल’ मिलेगी यकिनन।
ये फैले हुये उनके ‘पर’ बोलते है॥
अक्सर वो लोग खामोश रहते हे।
जमाने में जिनके ‘हुनर’ बोलते है॥
दीदीसाहेब येणार्‍या विधानसभेत  आपण आमदार म्हणून निवडून याव्यात आणि करमाळा तालुक्यातील दीनदुबळ्यांची सेवा करण्याची, त्यांचे प्रश्‍न सोडवण्याची ताकद आपणास प्राप्त होवो, हीच आई कमलाभवानी चरणी प्रार्थना...
- विजय लावंड , करमाळा