Sat, Nov 17, 2018 22:38होमपेज › Solapur › बँक दरोडयातील आरोपी रामेश्वर मासाळला जामीन मंजूर

सोलापूर: बँक दरोड्यातील आरोपी मासाळला जामीन

Published On: Jan 06 2018 6:37PM | Last Updated: Jan 06 2018 8:30PM

बुकमार्क करा
मंगळवेढा : प्रतिनिधी

बँक दरोडा प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याना पंढरपुर सत्र न्यायालयाकडून शनिवारी जामीन मंजूर झाला. याच बरोबर बँक व्यवस्थापक अमोल भोसले यांनादेखील जामीन मिळाला. 

रु ५० ००० च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात आरोपीच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तीवादात सदर आरोपी राजकीय व्यक्ति असुन ती सरपंच आहे त्याना राजकीय हेतुने गोवन्यात आले आहे. त्यांच्याकड़े दरोडयातील कोणतीही रक्कम सापडली नाही. 

पोलिसांचा प्रात्यक्षिक तपास पूर्ण झाला असुन त्याना कोठडीत ठेवण्याची गरज नाही असे सांगण्यात आले.  यानुसार न्यायाधीश पाटंणगणकर यांनी जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ॲड. मिलिंद थोबडे ॲड. धनजय हजारे यांनी काम पाहीले. तर सरकारी वकील म्हणून सारंग वांगीकर यांनी काम पाहिले