Thu, Aug 22, 2019 13:03होमपेज › Solapur › रामदेवबाबांचे सहायक टेंभुर्णीजवळ अपघातात जखमी

रामदेवबाबांचे सहायक टेंभुर्णीजवळ अपघातात जखमी

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:12PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कारची टँकरला धडक होऊन झालेल्या अपघातात राजेश कुमार पाल (वय 45,  रा. हरिद्वार) हे गंभीर जखमी झाले आहेत.ते योगगुरू रामदेवबाबा यांचे सहायक असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

अक्कलकोट येथे योगगुरू बाबा रामदेव यांच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ते आले होते. ते पुणे येथून विमानाने हरिद्वारला जाणार होते. यासाठी स्विफ्ट कारमधून (एमएच 13 एसी 6783) पुण्यास निघाले होते. टेंभुर्णीत बाह्यवळण रस्त्यावर दुधाचा टँकर (एमएच 13 - 7611) एकदम आडवा आल्याने स्विफ्ट कारची धडक झाली. यात राजेश कुमार पाल यांना तोंडाला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.कारचा  चालक सिद्धाराम माळी (वय 24) किरकोळ  जखमी झाला.अपघातानंतर टँकरचा चालक पळून गेला.

अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकाचे पोहेकॉ दिलीप केंगार व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags : Ramdev baba, assistant, injured,accident, near tembhurni,