Sun, May 19, 2019 14:32
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › साखर खरेदी-विक्रीची चौकशी करा : राजू शेट्टी (video)

साखर खरेदी-विक्रीची चौकशी करा : राजू शेट्टी (video)

Published On: Feb 16 2018 5:26PM | Last Updated: Feb 16 2018 5:26PMसोलापूर : प्रतिनिधी 

मुठभर साखर कारखानदार आणि व्यापारी यांनी जाणूनबूजून भाव पाडले आहेत. त्यामुळे साखर खरेदी-विक्रीची तातडीने चौकशी करावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते शहरातील कार्यकत्यांच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले की,‘साखर कारखानदारांनी दर पाडले आहेत. केंद्र सरकारने साखरेचा स्टॉक लिमिट उठवले पण त्याचा साठेबाजीसाठी उपयोग केला. आता ज्यांनी साखर खरेदी केली आणि त्याची विक्री झाली का याची चौकशी करा. ज्यावेळी सरकारने अटी आणि निकषांत वाढ केली तेव्हाच सरकारचा हेतू स्वच्छ नाही हे लक्षात आले होते.’

( व्हिडिओ : श्रीकांत साबळे)