Sat, Nov 17, 2018 20:34होमपेज › Solapur › दुष्काळी ३५ गावांसाठी पाचशे कोटी नाहीत काय?- खा. राजू शेट्टी

दुष्काळी ३५ गावांसाठी पाचशे कोटी नाहीत काय?- खा. राजू शेट्टी

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 2:04AMनंदेश्‍वर : वार्ताहर

नितीन गडकरी रोज वेगवेगळ्या मार्गांसाठी हजारो कोटी रुपयांची घोषणा करीत आहेत. कधी विजय माल्या, कधी निरव मोदी असे वेगवेगळे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे बाहेर येत आहेत. पण मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या योजनेसाठी या सरकारकडे 500 कोटी रुपये नाहीत काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. नंदेश्‍वर ( ता. मंगळवेढा) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी अमोल हिप्परगे, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, राहुल जाधव, अ‍ॅड.राहुल घुले, अनिल बिराजदार, दत्तात्रय गणपाटील, सरपंच गेना दोलतडे, अध्यक्ष वसंत गरंडे, सुरेश गरंडे, दादासाहेब मदने, भाऊसाहेब संतराम गरंडे,  सुनील गरंडे हे उपस्थित होते.

खा.शेट्टी पुढे म्हणाले, मोदींनी देशातील जनतेला खोटी आश्‍वासने देवून सत्ता मिळविली. माझ्यासहीत आपण सर्वजण त्याच्या खोट्या आश्‍वासनांना फसून वेड्यात निघालो. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे गाजर दाखवून मोदींनी आपली सर्वात मोठी फसवणूक केली आहे. येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गाशा गुंडाळायला लावण्याचा निर्वाणीचा इशाराही खा. शेट्टींनी यावेळी दिला. यावेळी मंगळवेढा तालुक्यातून विविध ठिकाणाहून शेतकरी बांधव, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.