Fri, Aug 23, 2019 23:13होमपेज › Solapur › रेल्वेकडून प्रवाशांचा विमा बंद!

रेल्वेकडून प्रवाशांचा विमा बंद!

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 9:18PMसोलापूर : इरफान शेख

रेल्वेने प्रवास करण्यासाठी आयआरसीटीच्या संकेतस्थळावरून तिकीट  बुकींग  केले असता 1 रुपया  ज्यादा घेत विमा सेवा दिली जात होती. रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून विमा सुविधा दिली जात होती. परंतु 1 सप्टेंबरपासून प्रवाशांसाठी असलेला हा विमा  बंद  करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

डिसेंबर 2017 पासून आयआरसीटीसीने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोफत यात्रा विमा योजना सुरु केली होती. या विम्या अंतर्गत प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा मोबदला देण्याची सुविधा होती.प्रवासामध्येच भारतीय रेल्वकडून झालेल्या अपघातामध्ये प्रवाशाला अपंगत्व आल्यास 7.5 लाखापर्यंतचा मोबदला होता. जखमी झाल्यास 10 हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई विमा सुविधेमधून मिळण्याचे प्रावधान होते. प्रवाशांना  आयआरसीटीसीकडून दिल्या जाणार्‍या मोफत विमा सेवेवर  भविष्यात शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर जनता रेल्वे मार्गाने प्रवास करते. भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हणून देखील ओळखले जाते. कोकण रेल्वे विभाग धरून भारतीय रेल्वेमध्ये एकूण 17 विभाग कार्यरत आहेत व प्रवाशांसाठी सेवा देत आहेत. 

दरवर्षी भारतीय रेल्वेच्या 8,702 प्रवासी गाड्यांमधून 5 अब्ज प्रवासी 26 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधून प्रवास करतात. सिक्किम आणि मेघालय या दोन राज्यात रेल्वे जात नाही. एका डब्याची क्षमता 18 असून 72 प्रवासी वाहून नेण्याची असते. 

परंतु सुट्टीच्या दिवसात अथवा अतिव्यस्त मार्गांवर ही क्षमता नियमितपणे ओलांडलेली आढळते. लोकसभेत रेल्वे मंत्रालयातील राज्यमंत्री राजेंद्र गोहिन यांच्या मते, 2017  च्या पहिल्या सहा महिन्यांत 29 दुर्घटना घडल्या त्यात 57 जणांचा मृत्यू झाला आणि 58 जण जखमी झाले. 

2017 मध्ये झालेले रेल्वेचे अपघात
21 जानेवारी -  गाडी क्र. 18448 जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंद एक्स्प्रेस कुनरु रेल्वे रूळावरून घसरल्याने 41 मृत झाले व 68 जण जखमी झाले.

7 मार्च - भोपाळ-उज्जैन पॅसेंजरवर  बॉम्बफेक झाल्यामुळे जब्री रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. मध्य प्रदेश सरकारने याला अतिरेकी हल्ला होता असे सांगितले होते.
30 मार्च - महाकुशल एक्स्प्रेसचे 8 डबे उत्तरप्रदेशच्या कुलपहार्टजवळ घसरल्याने 52 जण जखमी झाले होते.

15 एप्रिल- मेरठ-लखनौ राणी एक्स्प्रेसचे रामपूरजवळ 8 डबे रुळावरून घसरले.24 प्रवासी जखमी झाले होते.

19 ऑगस्ट - गाडी क्र. 18478 पुरी-हरिद्वार कलिंगा उत्कल एक्स्प्रेसचा उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील  खटौळी गावांमध्ये झालेल्या अपघातात 23 प्रवासी ठार व सुमारे 97 प्रवासी जखमी झाले होते.
23 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या  सुमारास कैफियत एक्स्प्रेसचा  (गाडी क्र. 12225) पटना आणि अचलदा या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या अपघातात 100 प्रवासी जखमी झाले होते.
24 नोव्हेंबरला वास्को द गामा-पाटणा एक्स्प्रेस उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील अपघातात 3 प्रवाशांनी जीव गमावला होता.

प्रवासी विमा बंद झाल्यास नुकसान भरपाई कोण देणार?
भारतीय रेल्वे प्रशासनाने ऑनलाईन तिकीट बुकींगवर दिला जाणारा विमा बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आयआरसीटीसीवरुन तिकीट बुक केल्यास प्रवाशांना 10 लाखांपर्यंतचा विमा मिळत होता.आयआरसीटीसीवरुन तिकीट बुकींग करताना प्रवाशांना विम्यासाठी वैकल्पिक सुविधा देण्याच्या विचारात आहेत. डिसेंबर 2017 पासून सुरु झालेली मोफत  प्रवासी विमा सेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.